पुणेरी खाद्य संस्कृती...
पुणेरी खाद्यसंस्कृती पुणेरी या शब्दाची व्याख्या काय तर ज्याने पुण्यामध्ये किमान दहा वर्षे वास्तव्य केले आहे असा , हे प्रथम लक्षात ठेवायला हवे. सुमारे दहा वर्षांनंतर पुणेरीपण अंगात हळुहळू मुरायला लागते. पण तुम्हाला स्वत:ला पुणेकर व्हायचे असेल तर इथल्या संस्कृतीची सहाजिकच माहिती करून घ्यायला हवी. इथली एकूणच संस्कृती आणि विशेषतः खाद्य संस्कृती पचनी पडायला तसा वेळच लागतो. इथे एक लक्षात ठेवायला हवे, पुणेरी खाद्यसंस्कृती दोन प्रकारामध्ये विभागली आहे. आता पुण्यात खाण्याचे दोन प्रकार कोणते , असे विचारल्यावर , त्यात काय अवघड आहे असे कोणीही म्हणेल . पण तुम्ही पुणेकर नसाल , तर बहुतांशी तुमची उत्तरे चूक आहेत , हे आम्ही तुमची उत्तरे न ऐकताच सांगु शकतो. सर्वसाधारणपणे शाकाहारी आणि मांसाहारी हेच उत्तर बरोबर आहे , असे सर्व जण मानतील. पुण्याची थोडी अधिक माहिती आहे असे वाटत असेल , तर पुण्याच्या भौगोलिक रचनेप्रमाणे शहर व कॅम्प येथे बनणारे पदार्थ, असे उत्तर बर...